नवी दिल्ली, २ डिसेंबर २०२२ जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा दरात होत असलेल्या बदलामुळे भारतीय कंपन्यांनी २ डिसेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. २१ मे पासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव ‘जैसे थे’च ठेवले आहेत.
राजधानी दिल्लीत आज शुक्रवारी एक लीटर पेट्रोलचा भाव ९६.७२ रुपये तर डिझेल ८९.६२ रुपये इतके झाले आहे. तर मुंबईत पेट्रोलचा भाव १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये इतके, चेन्नईत पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ रुपये, तर कोलकातामध्ये एक लीटर पेट्रोलसाठी १०६.०३ रुपये आणि डिझेलसाठी ९२.७२ रुपये मोजावे लागत आहेत. तर पुणे शहरात पेट्रोलचा दर १०६.६७ रुपये आणि डिझेलचा दर ९३.१६ रुपये इतका आहे.
- बिकानेरमध्ये पेट्रोल ११०.७२ रुपये
राजस्थान राज्याची राजधानी जयपूर मध्ये पेट्रोलचा भाव १०९.४८ रुपये, तर डिझेल ९३.७२ रुपयांवर कायम आहे. तर बिकानेरमध्ये पेट्रोल ११०.७२ आणि डिझेल ९५.७५ रुपये इतके झाले आहे.
- दररोज ६ वाजता किंमती बदलतात
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.