गोल पोस्ट गुन्हा फरार हल्लेखोर ताब्यात…

फरार हल्लेखोर ताब्यात…

उस्मानाबाद, १८ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद येथील तांबरी या विभागातील तात्पुरत्या कारागृहातून फरार झालेल्या आरोपीला काल दिनांक १७ ऑगस्ट रोजी पोलीसांनी पकडले.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ रोजी पाडोळी येथे जाहीर सभेसाठी गेले असता, पाडोळी मधील अजिंक्य टेकाळे या तरूणाने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूने खूनी हल्ला केल्यामुळे त्याला पोलीसांनी अटक करून जेरबंद केले होते. दहा महिन्यांपासून तो जेरबंद होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला तात्पुरत्या कारागृहात आणले गेले होते . वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले होते.

मात्र, रुग्णालयातून वापस तात्पुरत्या कारागृहात आल्यानंतर संबंधित हल्लेखोर काल दिनांक १७ ऑगस्ट रोजी दुपारी पोलीसांना हिसका देऊन पळून गेला होता . फरार हल्लेखोराला शोधण्यासाठी पोलीसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. आणि, अखेर काल रात्री १०.१५ च्या सुमारास पोलीसांनी या फरार हल्लेखोराला शिंगोली येथील हनुमान मंदिरा जवळून ताब्यात घेतले.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version