फुले दाम्पत्याने उभारलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेला १७२ वर्ष पूर्ण

पुणे : बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी १ जानेवारी १८४८मध्ये पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेच्या स्थापनेला आज १७२ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळी येथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली होती. आणि येथूनच महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली होती.

याशिवाय ज्योतिबा फुले यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत १८५२मध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा स्थापन केली होती. ज्यावेळी फुले दाम्पत्य हे कार्य करत होते.त्यांना समाज कंटकांकडून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी माघार घेतली नाही. त्यावेळी जोतिबा फुलेंनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन शिक्षण कार्य करण्यासाठी प्रवृत्त केले.त्यावेळी भारतातील शाळेची पहिली महिला मुख्याध्यापिका म्हणून त्यांनाच मान आहे. याशिवाय फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे फुले दाम्पत्य हे पहिले भारतीय होते.
आज ज्योतिबा फुलेंनी स्थापन केलेल्या या शिक्षण रुपी वटवृक्षाला १७२ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त पुण्यात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही हा दिवस ” फुले दाम्पत्य सन्मान दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त आज भव्य रॅली काढण्यात आली होती.
भिडे वाडा येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ होऊन ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलिस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलिस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडे आली. तिथून फुले वाड्यावर आलेल्या या रॅलीचे रूपांतर भव्य सभेत झाले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा