कोरोना वायरस लस विषयी संपूर्ण माहिती

सध्या कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जगात अस्थिरता निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत जगातील १३० देशांमध्ये कोरूना व्हायरस आढळला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन संस्थेने या वायरस ला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. आत्तापर्यंत तर या व्हायरसमुळे आठ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूणच पाहता ही एक जागतिक स्तरावर चिंताजनक गोष्ट बनली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना वायरस मुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. केवळ तीन महिन्यांमध्ये आठ हजार लोकांचा मृत्यू होणे हे चिंताजनक आहे त्यामुळे लवकरात लवकर या कोरोना वायरस वर औषध उपचार किंवा लस निघणे आवश्यक आहे. तर चला जाणून घेऊया आतापर्यंत याबाबतीत किती संशोधन करण्यात आले आहे.

शास्त्रज्ञांच्या मते कोरोना वायरस वरती लस निघण्यासाठी दोन वर्षांचा अवधी लागू शकतो. लस तयार करण्यासाठी काय प्रक्रिया असते ते आधी जाणून घेऊया. एखाद्या व्हायरस वर लस काढण्यासाठी त्या बाहेरचा मृत नमुना हस्तगत केला जातो तर दुसऱ्या पद्धतीत त्या व्हायरसचा कमजोर नमुना मिळवून तो मानवी शरीरामध्ये सोडला जातो. इथे तुम्हाला असे वाटेल की ज्याची भीती आहे तोच व्हायरस शरीरामध्ये का सोडला जातो. तर यामागे वेगळे कारण आहे.

मानवी शरीर हे वैज्ञानिक प्रगती होण्याआधी सुद्धा अनेक आजारांशी लढत आली आहे. हजारो वर्षांपासून अनेक प्रकारचे व्हायरस व रोग निर्माण झाले आहेत परंतु मानवी शरीर अशा वायरस किंवा रोगांच्या विरोधात आपली इम्युनिटी म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती वाढवत राहिले आहे. कोणताही नवीन व्हायरस मानवी शरीरात गेल्यास रोग प्रतिकार शक्ती त्या व्हायरसला निकामी करण्याचे काम सुरू करते. याला काही काळ जातो परंतु कालांतराने मानवी शरीर अशा विषाणूंच्या आक्रमणांपासून सुरक्षित राहण्यायोग्य प्रतिकारशक्ती नैसर्गिक रित्या तयार करते. हेच काम लस तयार करून केले जाते. एखाद्या व्हायरसचा मृत नमुना किंवा कमजोर नमुना मानवी शरीरामध्ये सोडला जातो जेणेकरून मानवी शरीर पुढील संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी अगोदरच त्या वायरस च्या विरोधात प्रतिकारशक्ती तयार करून ठेवते. थोडक्यात लस म्हणजे काय तर संभाव्य व्हायरस अगोदरच मानवी शरीरामध्ये सोडला जातो व मानवी शरीर त्याविरोधात रोगप्रतिकार शक्ती तयार करून ठेवते ज्यामुळे भविष्यात तो व्हायरस संक्रमित झाल्यास मानवी शरीर नैसर्गिक रित्या अशा व्हायरसला शहरातून नष्ट करते.

सिवीयर ॲक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस २(SARS COV-2) असे या कोरोना वायरचे सायंटिफिक नाव आहे. आपण त्याला कोरोना म्हणतो. या व्हायरसची संबंधित एक आणखी एक आजार २००२०-०३ आला होता. त्याचे हे नाव SARS असे होते म्हणजेच आत्ताचा कोरोना व्हायरस हा त्याच विषाणूचे वर्जन २ आहे. दुसऱ्या भाषेत याला covid – 19 म्हणजेच कोरोना व्हायरस डिसीज १९ असे म्हटले जाते.

कोरोना वायरस गटामध्ये सात प्रकारचे व्हायरस आहेत. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की कोरोना वायरस हा मानवी शरीरात प्रवेश करत नाही किंवा तो माणसाला इफेक्ट करत नाही. केवळ वरील दोन प्रकारचे कोरोना गटातील व्हायरस हे मानवी शरीराला संसर्गित करू शकतात.

आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. सध्या जगातील २० संस्थांमध्ये कोरोना वायरस वर संशोधन सुरू आहे. यामध्ये सर्वात आधी अमेरिकेतील सियाटल शहरातील एका ४३ वर्षीय महिलेवर व दोन व्यक्तींवर या लस चे परीक्षण करण्यात आले आहे. ही जी लस आहे ती प्राथमिक प्रकारातील आहे यावर आणखीन बराच काळ संशोधन सुरू राहणार आहे. परंतु या लस चे प्रत्यक्ष मानवी शरीरावर परीक्षण सुरू झाले आहे त्यामुळे आपण ही लस तयार करण्याच्या जवळपास आलो आहे. या लसीचे संशोधन अमेरिकेतील NIAID या सरकारी संस्थेमध्ये करण्यात आले आहे.

या लस चे नाव mRNA 1273 असे ठेवण्यात आले आहे. या लसीच्या माध्यमातून मानवी शरीरामध्ये कोरोना विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण केले जाऊ शकते. प्राण्यांवरील केलेल्या परिक्षणाचे परिणाम चांगले आल्यामुळे आता या लसीचे मानवी शरीरावर परीक्षण केले जात आहे. mRNA म्हणजे काय तर मेसेंजर RNA. मेसेंजर आर एन ए चे कार्य शरीरामध्ये काय असते तर डीएनए मधील सर्व माहिती शरीरातील पेशींच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचणे जेथे प्रोटिन्स तयार केले जातात. म्हणजेच एका अर्थाने डी एन ए च्या माहिती ला प्रोटीन चे प्रारूप कोण देते तर ते मेसेंजर आर एन ए देते. याच पद्धतीचा वापर करून शास्त्रज्ञांनी मेसेंजर आर एन ए च्या माध्यमातून असे प्रोटिन्स किंवा अंतीबोडीज कोरोना वायरस च्या स्पाईक वर पोचतील व कोरोना व्हायरसला नष्ट करतील.

तर या लस च्या परीक्षणामुळे मानवी शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत का असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो. ही लस बनवण्याची जी पद्धत आहे ती आधुनिक पद्धत आहे त्यामुळे याचा सुरुवातीच्या परीक्षणाचा मानवी शरीरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. पूर्वीच्याकाळी वायरचे जिवंत किंवा मृत सॅम्पल मानवी शरीरामध्ये सोडले जात असायचे उदाहरणार्थ पोलिओची लस बनवण्यासाठी पोलिओचे व्हायरस शरीरामध्ये सोडण्यात आले होते. परंतु आत्ता शास्त्रज्ञांनी आर एन ए च्या माध्यमातून कोरोना व्हायरस पर्यंत अंतीबोडीज पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिकेकडे इतक्या लवकर मेसेंजर आर एन ए चे सॅम्पल कसे उपलब्ध झाले तर जेव्हा जानेवारीमध्ये हा वायरस संसर्गित झाला होता तेव्हा चीनने याचा मेसेंजर आर एन ए सॅम्पल तयार केला होता व तो पूर्ण जगासाठी उपलब्ध करून दिला होता जेणेकरून यावर लवकरात लवकर संशोधन होऊन लस बनवली जाईल. सध्या हीलस प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे यावर आणखीन बरेच काम होणे गरजेचे आहे त्यामुळे ही लस बाजारात येण्यासाठी किंवा सामान्य लोकांना उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

 

                                                                                                                – ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा