गोल पोस्ट इतर राजकारण मागासवर्गीयांच्या हक्कांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे; जयंत पाटील याचा सरकारवर हल्लाबोल

मागासवर्गीयांच्या हक्कांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे; जयंत पाटील याचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई, ३१ मार्च २०२३: विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करुन टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाले आहेत. यानंतर आता मागासवर्गीयांच्या हक्कांच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजंनासाठी केलेल्या तरतुदींमध्ये सध्याच्या सरकारने मोठी कपात केली आहे. याचा फटका मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना बसला आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची मूळ अर्थसंकल्पातील तरदूत १२०० कोंटीवरुन ८४० कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या तरतुदीमध्येही कपात ‘स्टॅड अप इंडिया’ योजनेची मूळ अर्थसंकल्पातील असलेली १०० कोटी रुपयांची तरतूद कमी करुन १० कोटी करण्यात आली याबाबींकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version