उस्मानाबाद, १ ऑगस्ट २०२० : कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढतच जात आहे. या विषाणूवर नियंत्रण मिळवण्याकरिता शासन अत्यंत काटेकोर पणे कार्य करत आहेत. अशा मध्ये, रूग्णांची संख्या वाढत असताना त्यांना दवाखान्यात ने आण करते वेळी रूग्णांची हेळसांड होत होती. हे निदर्शनास आल्यानंतर, रूग्णांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी रुग्णवाहिका खरेदीसाठी निधी उपलब्ध केला असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तरी, या प्रसंगी रूग्णांची ने आण करते वेळी जिल्हा शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद येथे रुग्णवाहिके मुळे रूग्णांची हेळसांड होत होती.
ही गोष्ट लक्षात आल्यावर, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीने रूग्णांना सेवा मिळण्यासाठी रुग्णवाहिका खरेदीसाठी खासदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून रूपये १० लाख एवढा निधी दिला असल्याचे सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड