नवी दिल्ली, १ सप्टेंबर २०२०: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर लोधी रोडवरील स्मशानभूमीत आज दुपारी अडीच वाजता राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर एसओपी नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे त्याचा मृतदेह विशेष गाडीमध्ये न आणता व्हॅनमध्ये आणला गेला. त्यांचा मुलगा अभिजीत बॅनर्जी आणि बाकीचे कुटंबीयांनी पीपीई किट परिधान केलेले दिसले.
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी सोमवारी संध्याकाळी निधन झाले. १० ऑगस्ट रोजी त्यांना सैन्याच्या संशोधन व संदर्भित रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली. याच तपासणी दरम्यान त्यांना कोरोना विषाणूची लागणही झाली होती. यानंतर, त्यांची प्रकृती सुधारली नाही. ते कोमामध्ये होते आणि त्यांच्या फुफ्फुसांमध्ये व किडनीमध्येही संसर्ग झाला होता.
दिल्लीत विशेष शोकसभा आयोजित करणार बांगलादेश मिशन
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी बांगलादेश मिशन बुधवारी दिल्लीत एक विशेष शोकसभा घेणार आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की प्रणव मुखर्जी हे भारतातील अनुभवी राजकारणी होते. ५० वर्षांच्या राजकारणात त्यांनी चीन-भारत संबंधांमध्ये सकारात्मक योगदान दिले होते. चीन-भारत मैत्री आणि भारताचे हे मोठे नुकसान आहे. त्यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक आणि संवेदना व्यक्त करतो.
मंगळवारी सकाळी प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी १० राजाजी मार्गावरील त्यांच्या घरी आणण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी येथे येऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्र सरकारने त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान सात दिवसांचे राजकीय शोक जाहीर केले आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, अमित शहा, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी सोमवारी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, एक युग संपुष्टात आले आहे. त्याच बरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांनी राष्ट्रपती भवन हे ज्ञान, विज्ञान आणि संस्कृतीचे केंद्र बनविले.
न्यूज अनकट प्रतिनिधी