मराठी भाषेचे धिंडवडे काढणाऱ्या रेल्वे विभागाविरोधात रोष ; श्रीपाद भालचंद्र जोशींचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

4

नवी दिल्ली, ९ मे २०२३: मराठी भाषेचे धिंडवडे काढणाऱ्या रेल्वे विभागाविरोधात भाषा प्रेमींनी रोष व्यक्त केला आहे. मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये झळकणाऱ्या भाषांतरित मराठीतील सूचनांमुळे भाषा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. आता या संदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशींनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी भाषेचा असा अवमान करणारा व अतिशय चुकीचा असा मराठी भाषेचा वापर रेल्वे विभागाने तत्काळ थांबवण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांच्या सर्व विभागांमधून हिंदी कक्ष व हिंदी अधिकारी असतात, त्या प्रमाणे मराठी भाषा कक्ष आणि मराठी भाषा अधिकारी नेमले जावेत अशी मागणी पून्हा एकदा जोशी यांनी केली आहे.

मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशी सुविधा अंतर्गत डब्यांमध्ये फलक कार्यान्वित करण्यात आले आहेत. या स्क्रीनवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत सुचना देण्यात येतात. यामध्ये इंग्रजीमधील सूचनांचे इंटरनेटवरील पर्यायातून भाषांतर करण्यात आले आहे. यामुळे सुचना काहीतरी वेगळ्याच ऐकायला येतात. अशा सूचना स्क्रीनवर झळकल्याने मराठी भाषा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा