गोल पोस्ट इतर इतिहास गड आला पण सिंह गेला…..

गड आला पण सिंह गेला…..

आपण अनेक शूरवीरांच्या गाथा वाचतो, ऐकतो. कारण आपल्याला त्यांच्याबद्दल आदर असतो. कारण त्यांनी जे बलिदान दिले असते.त्याचा आपल्याला अभिमान असतो. असाच एक शूरवीर मावळा होवून गेला. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू, आणि प्रामाणिक होता. त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली तरी ते यशस्वीपणे पार पाडत. जो महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी काहीही करू शकत होता. तो म्हणजे तानाजी मालुसरे. त्यांच्याविषयी थोडेसे…..


ज्यावेळी महाराजांना कोंढाणा किल्ला जिंकायचा होता. तो किल्ला जिंकण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजी मालूसरेंवर सोपवली होती. जेव्हा तानाजी मालूसरेंना ही जबाबदारी त्यांना समजली.त्यावेळी आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी सोडून ते महाराजांना भेटण्यासाठी गेले होते.
त्यावेळी महाराजांची आणि मालुसरे यांची बैठक झाली. त्या बैठकीत महाराजांनी सांगितले की, कोंढाणा किल्ला जिंकणे आपल्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे. तसेच तो जर जिंकला नाही तर आपली सगळीकडे हसू होईल. तेव्हा कोंढण्याचा किल्लेदार होता पराक्रमी उदयभान. परंतु तरीही मालूसरेंना कोंढाणा किल्ला जिंकून आणण्याचा विडा उचलला. ते जेव्हा आपल्या तुकडी सोबत कोंढाणा जिंकण्यासाठी निघाले. तेव्हा ते म्हणाले की, “आधी लगीन कोंढण्याचं मग रायबाचं” पुढे जाऊन या वाक्याने इतिहास घडवल्याचे आपण सर्वांनी वाचले असेल.

गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा.

रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे दिवसा होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले होते. अचानक हल्ला करून त्यांनी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले.

शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडली.परंतु त्यांनी डगमगून न जाता स्वतःच्या डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला ठार करून स्वतः धारातीर्थी पडले होते. मात्र त्यांच्यामागुन ‘सूर्याजी मालुसरे’ आणि ‘शेलारमामा’ यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावर दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.

अशा अटीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहचले तेव्हा त्यांना समजले. महाराज म्हणाले “गड आला पण सिह गेला”. अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या उमरठे या गावी पाठवले. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा ‘वीरगळ’ स्थापन करुन एक सुंदर स्मारक उभे केले गेले आहे. तानाजी मालुसरेंच्या आदर्श सर्वांनी घेतला तर जगातून सगळे पाप नाहीसे होईल.
अशा या शूरविराची गाथा लवकरच चित्रपटाच्या रूपाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version