गडचिरोलीच्या लेडी टॅक्सी ड्रायव्हर किरणला मुख्यमंत्र्यांकडून ४० लाखांची ‘शिष्यवृत्ती’, उच्च शिक्षणासाठी लवकरच जाणार युकेला

गडचिरोली, ३१ जुलै २०२३ : महाराष्टातील गडचिरोली जिल्ह्या नक्षलग्रस्त म्हणून ओळखता जातो. टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या येथील एका मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधून घेतले आहे. किरण कुर्मा असे तिचे नाव आहे. तिला लंडनला जाऊन आपल्या इच्छेनुसार शिक्षण घेता यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचे किरणचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

किरण कुर्मा ही गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील रेगुंथा गावची रहिवासी आहे. तिने तेलंगणा राज्यातील हैदराबाद उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने रोजगारासाठी आपल्या गावात रेगुंथा ते सिरोंचा येथे टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली.

किरण कुर्मा हीने या शिष्यवृत्तीचा वापर करून, युकेला लीड्स विदयापीठात आंतरराष्ट्रीय मार्केटींग मॅनेजमेंटचा एक वर्षाचा अभ्यासक्रम करण्याची योजना आखली आहे. तेथील एका कंपनीत २ वर्ष काम केल्यानंतर त्यांनी घरी परतण्याचा प्लॅन केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा