गोल पोस्ट महाराष्ट्र गाडी पुलावरून घसरली; ७ ठार,१५ जण जखमी

गाडी पुलावरून घसरली; ७ ठार,१५ जण जखमी

धुळे : धुळे – सोलापूर महामार्गावर ऊसतोड मजूरांना घेऊन जाणारी गाडी पुलावरुन खाली कोसळली आहे. या झालेल्या भीषण अपघातात ७ मजूर जागीच ठार झाले असून १५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे हा अपघात धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील पुलावर मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.

याबाबत धुळे पोलिसांनी दिलेली महिती अशी की, मध्य प्रदेशातील सेंधवा येथील मजुरांना घेऊन एक पिकअ‍ॅप व्हॅन उस्मानाबादकडे चालली होती. ऊसतोडीसाठी हा मजुरांना घेऊन जाण्यात येत होते. धुळ्यातील चाळीसगाव – विंचूर रस्त्यावरील विंचूर गावातील एका पुलावरुन पिकअप व्हॅन थेट खाली कोसळली. खाली कोसळताना मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांनी तातडीने पुलावर धाव घेतली.

मात्र, संपूर्ण अंधार असल्याने खाली काहीच दिसून येत नव्हते. गावकऱ्यांनी तातडीने खाली जाऊन जखमींना उचलून रस्त्यावर आणले व तेथून धुळे हॉस्पिटलमध्ये नेले. पिकअप व्हॅनचा चालक फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितल.. या अपघातात ७ जण जागीच ठार झाले असून १५ जण गंभीर जखमी आहेत. आणखी १९ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. हे सर्व जण मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यातील दौलतगिरी येथील राहणारे आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version