राजवडी येथील गायकवाड कुटुंबियांचे आंदोलन स्थगित

इंदापूर, दि. १४ जुलै २०२०: इंदापूर तालुक्यातील राजवडी येथील गायकवाड वस्ती येथे मागासवर्गीय लोकांचे अतिक्रमण असल्याचे वनविभागाने दाखविले होते. मध्यंतरी झालेल्या वनविभागाच्या कारवाईमध्ये गायकवाड कुटुंबीयांचे नुकसान झाले होते. संबंधित पीडितांनी यासाठी आमरण उपोषण करण्याचे ठरवले होते. परंतू या घटने संबंधित वनविभागाचे तालुका वनक्षेत्रपाल राहुल काळे व सहाय्यक वनसंरक्षक एन मारणे ,सह वनपाल सी. चौधरी व वनरक्षक आणि इतर कर्मचारी यांनी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुचनेची दखल घेतली.

सदर अधिकाऱ्यांनी संबंधित कुटुंबीयांच्या ठिकाणी जाऊन त्यांना उपोषण करू नका म्हणून विनंती केली होती. त्याबाबतचा तसा पत्र व्यवहार ही केला होता. वनराज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांची संबंधित कुटुंबातील काही प्रमुखांनी व सामाजिक कार्यकर्ते व भटक्या विमुक्तांचे नेते तानाजी धोत्रे समवेत भेट घेऊन संबंधित वन खात्याचे अधिकारी इंदापूर व पुणे यांच्याविरुद्ध तक्रारीचा पाढा वाचला होता.

या वेळी राज्यमंत्री भरणे यांनी योग्य कारवाईचे आश्वासन देऊन उपोषण न करण्याचा बाबत आवाहन केले होते. त्यामुळे दिनांक १३ रोजीचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोरील नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले. त्या निवेदनाची प्रत एपीआय लोकरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गारुडी एस. आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी धोत्रे त्यांच्यासमोर नुकसानग्रस्त गायकवाड कुटुंबातील प्रमुखांनी इंदापूर पोलिस स्टेशनला तूर्त आंदोलन स्थगित करीत असल्याचे निवेदन दिले. पीडित कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी इंदापूर तालुका वडार समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थिती दाखवून सहकार्य केले. यामुळे वनराज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांची शिस्टाई फळाला आली असे बोलले जात आहे. भरणे यांच्या कृतीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा