जालना वकील संघ, कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गजानन शास्त्री महाराज यांचे शिवव्याख्यान

जालना ७ मार्च २०२४ : महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवचरित्राचे वाचन एकाच रात्री करून त्यामधील ज्ञान आत्मसात केले, अशा स्वराज्य उभारणीचे शिकवण देणा-या शिवचरित्राचे वाचन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते गजानन दादा शास्त्री महाराज यांनी केले. जालना जिल्हा वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवव्याख्यान कार्यक्रम प्रसंगी शिवव्याख्याते गजानन दादा शास्त्री महाराज हे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते यांचे सह जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड बाबासाहेब इंगळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड विकास पिसुरे यांच्या सह वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे कै.लक्ष्मणराव पाटील गायकवाड स्मृती प्रित्यर्थ प्रथम पारितोषिक आणि कै. विठ्ठलराव घोडे स्मृती प्रित्यर्थ द्वितीय पारितोषिक हे टायगर वॉरियर्स आणि उपविजेत्या टीमला प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील वकीलांसह सर्व न्यायिक अधिकारी,विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा