‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

मुंबई, १२ जानेवारी २०२३: ‘गांधी-गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला असून, ‘चर्चा गांधी किंवा गोडसेंची नाही, तर देशाची आहे.’ असे कॅप्शन देत दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी चित्रपटाचा ट्रेलर समाज माध्यमांद्वारे लोकांसमोर आणला आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर हा ‘नथुराम गोडसे’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तब्बल नऊ वर्षांच्या ब्रेकनंतर दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा चित्रपट पाहण्यासाठी त्यांचा प्रेक्षक वर्गही उत्सुक आहे.

https://www.instagram.com/reel/CnREa-Kr-QF/?igshid=MDM4ZDc5MmU=

चित्रपटाचे नाव वाचतात चित्रपटातील आशयाचा अंदाज येतो. गोडसे आणि गांधीजी यांच्यामधील वैचारिक युद्ध या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलरमधून महात्मा गांधी आणि गोडसे यांच्यातील वैचारिक मतभेद, एकमेकांसाठी असलेल्या भावना दाखवल्या गेल्या आहेत. ‘ज्या पाकिस्तानी हजारो हिंदू बांधवांची हत्या केली त्यांच्यासमोर गुडघे टेकायला लावले या गांधीने..’ या मतभेदात्मक वाक्याने ट्रेलरला सुरुवात झाली. पहिल्यांदाच स्क्रीनवर दिसणाऱ्या लहान मुलाच्या रडण्याने तेथील परिस्थितीची कल्पना दिली.

  • २६ जानेवारी रोजी चित्रपटगृहात

‘गांधी – गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून बॉलीवूड सिनेसृष्टीला दमदार चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शना बरोबरच लेखक आणि निर्माते म्हणून त्यांनी बॉलीवूड सिनेसृष्टीत पुन्हा एकदा पदार्पण केले आहे. तसेच प्रसिद्ध संगीतकार ए.आर रहमान यांनी सिनेमाच्या संगीताची जबाबदारी पार पाडली आहे. तर ट्रेलरमध्ये दिसल्याप्रमाणे दीपक अंतानी यांनी महात्मा गांधी तर चिन्मय मांडलेकर यांनी नथुराम गोडसे यांच्या भूमिका चोखपणे निभावल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटास प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळेल यात शंका नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा