गोल पोस्ट जळगाव चोपड्यात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त काँग्रेसकडून अभिवादन कार्यक्रम

चोपड्यात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त काँग्रेसकडून अभिवादन कार्यक्रम

चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने २ ऑक्टोबर २०२५, गुरुवार रोजी सकाळी १०:३० वाजता कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व चोपडा नगरीचे माजी नगराध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी भाषणात गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने केलेल्या विविध आंदोलनांची आठवण करून देत त्यांचे संपूर्ण आयुष्य राष्ट्राला समर्पित असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे लाल बहादूर शास्त्रींच्या कार्याचा गौरव करण्यात आला व त्यांचा “जय जवान, जय किसान” हा नारा आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमाला तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब सुरेश सिताराम पाटील, विद्यमान तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, माजी संचालक रमेश तात्या शिंदे, तसेच सूतगिरणीचे अनेक संचालक, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिवादन कार्यक्रमाने चोपडा शहरात गांधीजींच्या अहिंसेचा संदेश व शास्त्रीजींच्या कार्याची प्रेरणा पुन्हा अधोरेखित झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी आत्माराम पाटील, चोपडा

error: Content is protected !!
Exit mobile version