दक्षिण आफ्रिकेचे गांधी ;नेल्सन मंडेला

रोलिल्हाल्हा,मंडिबा ,नेल्सन मंडेला या नावाने परिचित असलेले नेल्सन मंडेला यांचा आज जन्मदिवस १८ जुलै १९१८ रोजी कृष्णवर्णीय कुटुंबात मंडेला यांचा जन्म झाला, घरची परिस्थिती अतिशय सधन असलेल्या कुटुंबात मंडेला लहानाचे मोठे झाले. लहानपणी मंडेला यांना रोलिल्हाल्हा या नावाने संबोधले जात होते . यांचा अर्थ खोसा भाषेत झाडांच्या फांद्या ओढणारा किंवा उपद्व्यापी यावरूनच त्यांचे गुणांची प्रचिती लहानपणीच येते.

शाळा व कॉलेज पूर्ण केल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळीकडे त्यांचा ओढा जास्त होता व त्याच बरोबर आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते वॉल्टर सिसुलु यांचा मोठा प्रभाव नेल्सन मंडेला यांच्या जीवनावरती होता. त्या कारणानेच नेल्सन मंडेला यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस मध्ये काम करण्यास सुरुवात केली व त्याचबरोबर त्यांनी आफ्रिकेतील भारतीय समाज ,गोऱ्या लोकांचा जाच, जागतिक चळवळीचा व्यापक अभ्यास केला. कृष्णवर्णीयांचे त्यावेळची विदारक परिस्थितीचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. १९५२ साली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस मध्ये नेतृत्व बदल झाला व नेल्सन मंडेला यांना सहाय्यक अध्यक्ष अशी जबाबदारी नॅशनल काँग्रेसने दिली.

ऐन उमेदीच्या वयामध्ये नेल्सन मंडेला यांना जून १९६४ च्या साली ५ वर्षांची शिक्षा झाली व ती पुढे जाऊन जन्मठेपेत रूपांतरित केली गेली. रोबेन आयलंड ह्या बेटावर २७ वर्षे तुरुंगातवासात काढावी लागली. जगातील कोणत्याही नेत्याने इतका मोठा तुरुंगवास भोगला नसेल. शिक्षा भोगत असताना त्यांच्यावर ती अमानुष अत्याचार व हाल करण्यात आले त्यांना तेथे मुद्दामून चुन्याचे काम देण्यात आले होते कारण ते ध्येयापासून विचलित व्हावे. नेल्सन मंडेलांचे सहकाऱ्यांनी हात टेकले होते पण मंडेलांनी कधीही हार पत्करली नाही किंवा ध्येयापासून विचलित झाले नाहीत किंवा त्याविषयी कधी तक्रारही केली नाही.

कारण मंडेला नेहमी म्हणतात की खरे नेते सर्व गोष्टीचा त्याग करतात त्याची प्रचिती त्यांनी शिक्षा भोगत असताना दाखवली. ही किमया फक्त मनाने कणखर व आपला देश व समाज यांच्या वरती निस्सीम प्रेम करणारच व्यक्ती करू शकतो. त्याही परिस्थितीत त्यांनी पुस्तक लिहायला ही घेतले १९७४ साली लिखाणास सुरुवात केली पण तुरुंग मधील अधिकाऱ्याने त्यांच्या बऱ्याच या प्रति नष्ट केल्या पण सहकाऱ्यांच्या मदतीने सुरक्षितस्थळी पोहोचल्या १९९० ला बाहेर पडल्यानंतर त्या प्रकाशित केल्या त्यांचे नाव व ते प्रदीर्घ वाटचाल स्वाधीनतेकडे.

फेब्रुवारी १९९० ला पहिल्यांदा जेलच्या बाहेर आले त्यावेळी एकदम शांत, चेहऱ्यावरती उमेद, उत्साह व डोळ्यात देश, समाज याविषयी २७ वर्षात पाहिलेले स्वप्न होते. दुसरा कोणीही नेता किंवा कार्यकर्ता इतक्या मोठ्या शिक्षणे कधीच तुटला किंवा विचलित झाला असता पण ते नेल्सन मंडेला होते कणखर व दृढनिश्चयी मंडेला यांच्यावर ती महात्मा गांधी यांच्या विचारांचाही मोठा प्रभाव होता त्या कारणाने त्यांना ‘दक्षिण आफ्रिकेचे गांधी’ म्हणूनही परिचित होते.

१९९० च्या दशकात ज्यावेळी मंडलाबाहेर आले त्यावेळी दक्षिण आफ्रिकेमध्ये पी डब्ल्यू बोथाचे सरकार होते व बोथा सरकारने त्यावेळी जुलूम व अन्ययांचे सर्व बंधने तोडून मुख्य भूमिपुत्र कृष्णवर्णीय यांच्यावरती अविरत अत्याचार करत होते. आर्थिक-सामाजिक या विषयांच्या गंध हे घ्या लोकांपर्यंत पोहोचला नव्हता. अज्ञान ,रोगराई यामध्ये समाज खितपत पडला होता त्यातच बोथा सरकारकडून अविरत हाल चालू होते. १९८९- ९० च्या सुमारास काही कारणाने बोथानां पदत्याग करावा लागला. त्यानंतरही क्लार्क हे थोडेसे मवाळ व्यक्तिमत्व अध्यक्ष झाले सरकार व आफ्रिकन नॅशनल काँग्रेस यांच्यातील दुरावा कमी होऊन सरकार बरोबर सकारात्मक बोलणी व वाटाघाटी चालू झाल्या.

दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी जनसमुदाय पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत व छोट्याशा गोष्टींनाही ठिणगी पडून आगडोंब उसळला याची शक्यता होती पण नेल्सन मंडेलांनी आपल्या जनतेवर दाखवलेला विश्वास व प्रेमाने परिस्थिती हाताळून पुढचे होणारे गंभीर परिणाम थांबवले. २७ एप्रिल १९९४ रोजी दक्षिण आफ्रिकेत मतदान घेऊन वर्षानुवर्षे वाळीत टाकलेले अन्याय, गुलामगिरी निमूटपणे सहन करणारे व काळे म्हणून हिनवलेल्या समुदायातील पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून विजयी झाले. व बहुमतही मिळवले देशातील कृष्णवर्णीयांचे लाडके मंडेला राष्ट्राध्यक्ष झाले. देश चालविताना त्यांनी कोठेही गोर्या लोकांबद्दल द्वेष केला नाही की संताप व्यक्त केला नाही. याउलट त्यांनी क्लार्क यांना उपाध्यक्ष केले. त्यांनी पहिल्यांदा शिक्षण सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला व शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला. त्यांनी मनात कोठेही आकस न ठेवता गोऱ्या मुलांच्या शाळेचे शासकीय अनुदान बंद केले नाही इतके मंडीबा उदारमतवादी होते. त्यांच्यामुळेच दक्षिण आफ्रिका जी विनाशाकडे व हुकूमशाहीकडे वाटचाल करत होती ती मंडळांनी लोकशाहीचा भक्कम पायावर उभी केली.

देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी त्यांना प्रयत्न व काम केले त्यांची दखल घेऊन त्यांना १९९३ साली शांततेचे नोबेल पारितोषक बहाल करण्यात आले त्याचबरोबर त्यांना देश व विदेशातील जवळपास २५० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. १९९८ साली दक्षिण आफ्रिकेच्या संसदेत भाषण करताना क्युबा चे अध्यक्ष फिडेल कॉस्ट म्हणाले, “मंडळांनी भोगलेल्या २७ वर्षांचा करावासामुळे त्यांना इतिहासात स्थान मिळाले नाही तर त्यांनी अन्याय, कारावास याबद्दल कुठलीही कटुता न ठेवता सुडाची भावना उफाळून ना देता राष्ट्र बांधणीचे कार्य केले त्यामुळेच ते चिरंजीव झाले आहेत. त्यांची सहिष्णुता व ज्या चतुराईने त्यांनी विजयाने बेभान झालेल्या जनसमुदायाला आवरले त्यांची आठवण जगाला सदैव राहील”

अशा या थोर नेत्याचा आज जन्म दिवस आपण केलेल्या कार्यासमोर दक्षिण आफ्रिका तर नेहमीच नतमस्तक राहील पण जग ही तुम्हाला व तुमच्या कार्याला विसरणार नाही.

अशोक कांबळे .

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा