Ganesh Festival Declared Maharashtra’s Official State Festival: आत्तापर्यंत साजरा होणारा गणेशोत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रभर अधिकृत राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली असून ह्यावर्षीपासून हा मोहोत्सव संपूर्ण राज्यभरात साजरा होणार आहे . गणेशोत्सव म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा मुख्य सांस्कृतिक सण म्हणूनच ह्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महायुती सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. हा निर्णय केवळ परंपरेचा गौरव नसून, सामाजिक एकात्मता, शिस्तबद्धता आणि सांस्कृतिक समृध्दीचा नवा अध्याय ठरणार आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करीत आहे, त्याबद्दल आज विधानसभेत विविध मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहे .
हा सण आपल्या राज्यापुरता मर्यादित न राहता ह्या सणाची व्याप्ती आणि प्रचार जगभरात करण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल तसेच काही नेते मंडळींनी न्यायालयात या निर्णयास विरोध केला परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ह्या निर्णयास अखेर मान्यता मिळाली असे आशिष शेलार यांनी आपल्या सोशल मीडिया वर सांगितलं . तसेच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांनी संमती दिली आणि जे निर्बंध होते तेही बाजूला निघाले. न्यायालयाच्या निवाड्यानुसार पीओपी मुर्त्या बनवणे, डिस्प्ले करणे आणि विकणे यालाही परवानगी मिळाली आहे
गणेशोत्सवाच्या बाबतीत महायूती सरकारने भूमिका घेतली असून पोलीस सुरक्षा वाढविण्यात येणार आहे . आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च तसेच पूर्ण राज्यातला खर्च त्यासाठी लागतील तेवढा निधी राज्य सरकार खर्च करणार आहे , कारण गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणे ही महायुतीची आणि या शासनाची भूमिका आहे. तसेच शेलार यांनी सर्व सर्व गणेशोत्सव मंडळांना विनंती केली आहे कि देखाव्यांचे स्वरूप हे आपले सैन्य,सैनिक, सामाजिक उपक्रम, ऑपरेशन सिंदूर, देशांतर्गत विकासाची कामे, आपले महापुरुष अशा सगळ्या विषयांवर करून नागरिकांना जागरूक करण्याचे काम करावे . सामाजिक भान राखून पर्यावरणपूरक वातावरणात हा उत्सव साजरा करू अशा भावना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केल्या .
न्यूज अनकट प्रतिनिधी; तनया रेडकर













































