पुणे: शहरातील कोंढवा बुद्रुक परिसरात मंगळवारी रात्री १२ तरुणांच्या टोळक्याने अक्षरशः दहशत माजवली. दुचाकींवरून फिरत या टोळक्याने रस्त्यावर रॅश ड्रायव्हिंग, नागरिकांना शिवीगाळ, तसेच मारहाण आणि तोडफोड करत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं.माहितीनुसार, या टोळक्याने रस्त्याने जाणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याला आणि एका कुरिअर बॉयला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली.
एवढ्यावरच न थांबता काही वाहनांची तोडफोड करत नागरिकांना धमकावण्याचाही प्रकार घडला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिसरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. या ऑपरेशनदरम्यान संबंधित तरुणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांचा धाक बसला पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारत या तरुणांना रस्त्यावरच हात जोडून माफी मागायला लावली, तसेच पुन्हा असे प्रकार न करण्याचा इशारा दिला.
