पुणे : कामगार चळवळीत युवा नेतृत्व म्हणून उदयास येत असलेले सामाजिक कार्यकर्ते शुभम कुडले हे सध्या कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नाव म्हणून ओळखले जात आहेत. जेष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते Dr. Baba Adhav यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक आणि कामगार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे.
शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारसरणीचा वारसा जपत शुभम कुडले यांनी सामाजिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हमाल, माथाडी आणि कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी ते सातत्याने आवाज उठवत असून विविध प्रश्न प्रशासनासमोर मांडत असतात.
कामगारांना रोजगार, न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी शुभम कुडले यांची सातत्यपूर्ण धडपड सुरू असल्याचे दिसून येते. सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून संघर्ष करण्याची त्यांची शैली युवकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
डॉ. बाबा आढाव यांचा सहवास लाभल्याने सामाजिक बांधिलकी, संघर्षाची जिद्द आणि समाजसेवेची प्रेरणा अधिक मजबूत झाल्याचे शुभम कुडले यांनी सांगितले. अत्यंत मनमिळाऊ, दिलखुलास आणि गरजूंच्या मदतीला तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
युवा पिढीने सामाजिक कार्यात पुढे येऊन कामगार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला पाहिजे, असा संदेश त्यांच्या कार्यातून समाजात पोहोचत आहे. त्यामुळे सामाजिक चळवळीत त्यांचे योगदान भविष्यात अधिक प्रभावी ठरणार असल्याची चर्चा विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड
