गोल पोस्ट राष्ट्रीय बसमध्ये सामूहिक बलात्कार… महिलेला मुलासह बांधून फेकलं नदीत, मुलाचा मृत्यू

बसमध्ये सामूहिक बलात्कार… महिलेला मुलासह बांधून फेकलं नदीत, मुलाचा मृत्यू

बक्सर (बिहार), १२ ऑक्टोंबर २०२०: बिहारमधील बक्सरमध्ये काही लोकांनी आपल्या पाच वर्षाच्या मुलासह बँकेत जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेला तिच्या मुलासह बांधून नदीत फेकून देण्यात आलं. यामुळं मुलाचा मृत्यू झाला आहे. महिलेची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

बिहारच्या बक्सरमधील या निर्दयी घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं आहे. मुरार पोलिस ठाण्यातील ओझा बराव गावात बँकेत जाणाऱ्या महिलेला तिच्या मुलासह पळवून नेले आणि त्यानंतर महिलेला आणि तिच्या मुलाला सामूहिक बलात्कारानंतर नदीत बांधून फेकलं गेलं.

या घटनेसंदर्भात पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की त्यांची मुलगी आपल्या पाच वर्षाच्या मुलासह बँकेत गेली होती. पण, रात्री ११ नंतर तिचा मोबाईल बंद झाला. सकाळच्या दरम्यान त्यांची मुलगी व नातू बांधलेल्या आवडते नदी मध्ये सापडले. पीडितेला वाचवण्यात आलं मात्र, तिच्या मुलाचा मृत्यू झाला.

वडिलांच्या म्हणण्यानुसार पीडितेनं सांगितलं की काही लोकांनी तिला घेरलं आणि त्यानंतर अपहरण करुन सामूहिक बलात्काराची घटना घडवून आणली. त्यानंतर त्या महिलेला मुलासह बांधलं व तिला नदीत फेकलं.

पीडितेच्या वडीलांच्या म्हणण्यानुसार जेव्हा तिनं आरडाओरडा सुरू केला आणि लोकांनी तो आवाज ऐकला तेव्हा लोकांनी तिला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मुलीला नदीतून बाहेर काढण्यात आलं होतं, परंतु तिचा मुलगा आधीच मृत्युमुखी पडला होता. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर पोलिस एका गुन्हेगाराला अटक करून चौकशी करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version