गोल पोस्ट गुन्हा होशंगाबादमध्ये दलित महिलेसोबत सामूहिक बलात्कार…

होशंगाबादमध्ये दलित महिलेसोबत सामूहिक बलात्कार…

होशंगाबाद, ६ ऑक्टोंबर २०२०: देशात सतत बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमधील हाथरसनंतर मध्य प्रदेशातील होशंगाबादमध्ये दलित महिलेसोबत सामूहिक बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. पीडितेनं आरोप केला आहे की, आदिवासी गाव पूनोर येथील गावगुंड गावकऱ्यांनी तिला घरातून उचललं आणि रायसेन येथील सिलवानी येथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

या प्रकरणात होशंगाबाद पोलिसांनी राजेंद्र किरार, धर्मेंद्र किरार यांच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे. तर चार आरोपीही फरार आहेत. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिस सातत्यानं प्रयत्न करत आहेत.

पीडितेचा आरोप आहे की, गावगुंडांनी तिला तिच्या घराबाहेर नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली तेव्हा पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि पोलिसांनी तिघांना अटक केली असूनही ४ लोक अद्याप फरार आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.

मध्य प्रदेशातील बलात्काराच्या घटनांनंतर काँग्रेस पक्ष सातत्यानं मध्य प्रदेश सरकारवर टीका करत आहे. मध्य प्रदेश काँग्रेसनं ट्विट केलं आहे की, “मुलींच्या किंकाळ्यांने हादरला मध्य प्रदेश, भोपाळ आणि रिवा येथे धक्कादायक घटना; शिवराजांच्या सत्तेच्या लोभाने मध्य प्रदेशातील मुलींना पुन्हा असुरक्षित बनवले आहे. शिवराज जी, हा दिवस जनतेला दाखवण्यासाठी गद्दाराच्या सहाय्यानं सरकार पडलं आणि सत्तेत अलात? मुलींच्या या किंकाळ्या शिवराजजींना कधी ऐकायला येणार? ”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version