गंगापूर- छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना; वडील जखमी
आयशर ट्रकनेच्या धडकेत दुचाकीवरील चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बाबरगाव फाट्याजवळ घडली. विराट प्रदीप जाधव (वय ५) व खुशी प्रदीप जाधव (वय २.५, रा. दोघेही शेकटा, ता. पैठण) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.
शेकटा येथील प्रदीप जाधव हे वैजापूर तालुक्यातील महागाव येथे रविवारी लग्नकार्यासाठी गेले होते. लग्न आटोपन सोमवारी सकाळी ते विराट व खुशी या आपल्या दोन मुलांसह दुचाकी वरून गंगापूर मार्गे शेकटा येथे जात असताना छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बाबरगाव फाटा येथील जिनिंगसमोर छत्रपती संभाजीनगरकडून गंगापूरकडे येणाऱ्या आशसयने ने जाधव यांच्या दचाकीला धडक दिली या दोन चिमुकल्यांच्या मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: संजय आहेर









































