“गंगेमधील मृतदेह नायजेरियातील” कंगना झाली पुन्हा ट्रोल…..

5

नवी दिल्ली, १५ मे २०२१: अभिनेत्री कंगना रणावत पुन्हा एकदा एका विधानानं सोशल मिडीयावर टीकेची धनी ठरलीय. ट्विटर वर मध्यंतरी आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळं ट्विटरनं तिचं ट्विटर अंकाऊट कायमचं बंद करून टाकलं. तरीही कंगना थांबायचं नाव घेत नाहीये. फेसबुक, इन्टाग्रामवर ती सध्या व्यक्त होत आहे. तर तिथंही तिचं ट्रोल करणारं विधाने सुरुच आहेत, ज्यामुळं कंगना खरोखरच अशी का वागतीय याचा प्रश्न अनेकांना पडलाय.

फेसबुकवर एक व्हिडिओ शेयर केलाय, ज्यामध्ये तिनं गंगेमध्ये वाहणाऱ्या मृतदेहांवर भाष्य केलंय. कंगनानं व्हिडिओत गंगा नदीत वाहणारे मृतदेह हे नायजेरिया चे आसल्याचं म्हटलंय. तर तसेच इस्राईल आणि पॅलेस्टाईन बद्दल ही भाष्य केलं आहे. कंगनानं असं भाष्य केल्यामुळं नेटकरी तिच्यावर चांगलेच नाराज झाले असून सोशल मीडियावर तिचा समाचार घेतला जातोय.

या व्हिडिओ मधे भावना व्यक्त करताना अभिनेत्री कंगनानं देशातील नागरिकांना ईद, अक्षय तृतीय, परशुराम जयंती च्या शुभेच्छा ही दिल्या आहेत. तसेच नागरिकांना आश्या कठीण काळात नागरिकांनी संयम ठेवणं गरजेचं आहे असंही म्हटलं. तर यावरून जर धडा घ्यायचा असेल इस्त्राईल पॅलेस्टाईन मध्ये पाहवं असं कंगना म्हणते. सात देशांना त्रास देण्याचे काम काही निवडक माणसं करत आहेत ती म्हणाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा