NIA च्या रडारवर देशभरातील गँगस्टर

दिल्ली १२ सप्टेंबर २०२२: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) सोमवारी गँग आणि गुन्हेगारी सिंडिकेटवर कारवाईसाठी देशभरात ६० ठिकाणी छापेमारी सुरू केली. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील ठिकाणांचा समावेश आहे.

मुसेवालाच्या हत्येनंतर करण्यात आलेल्या तपासात अनेक गँगचे ISI आणि खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले होते. एनआयएची ही कारवाई देशभरातील गुंडांच्या अड्ड्यांवर केली आहे.तसेच देशभरातील विविध गुंडांच्या ठिकाणांवर ही छापेमारी केली जात आहे. यामध्ये गोल्डी ब्रारसारख्या गुंडांचा समावेश आहे. ज्याने कॅनडातून सिद्धू मूसेवाला हत्येचे सूत्रसंचालन केले होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेन्स बिश्नोई टोळी, बंबीहा गँग आणि नीरज बवाना टोळीशी संबंधित असलेल्या १० गुंडांविरुद्ध प्रतिबंध कायद्यांतर्गत (UAPA) दोन एफआयआर नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. एवढेच नाही तर, पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी आणि दहशतवादी गट आयएसआय यांच्यात जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारसह संदीप उर्फ काला जथेडीचे दहशतवादी कनेक्शनही समोर आले आहे. त्यानंतर देशभरात ही छापेमारी केली जात आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा देखील रडावर होता. मुसेवाला हत्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने कबूल केले आहे की, कपिल पंडित आणि त्याचे दोन साथीदार हे सलमान खानच्या मुंबईतील घराची रेकी करायला गेले होते. असा पंजाब पोलिसांनी देखील खुलासा केला आहे.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात २३ जणांना अटक करण्यात आली आहे तसेच या प्रकरणात एकूण ३५ जणांची नावे सांगण्यात आली. तसेच यामध्ये चकमकी दरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या तपासात कपिल पंडितला लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानलाही लक्ष्य करण्यास सांगितले होते.

न्यूज प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा