“गंगुबाई काठियावाडी” सिनेमाचा फस्ट लूक व्हायरल

मुंबई : ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित संजय लीला भन्साळी यांनी ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमात अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे.

संजय लीला भन्साळी निर्मित या सिनेमात अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत झळकणार असून नुकताच या सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे. हा सिनेमा ११ सप्टेंबर २०२० ला रिलीज होत आहे.
गंगुबाई यांना लहान वयातच वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलं होतं. वेश्याव्यवसाय करत असताना त्यांची अनेक कुख्यात गुंडांसोबत ओळख झाली होती. हे सारं काही ‘गंगुबाई काठीयावाडी’ या सिनेमात दाखविण्यात येणार आहे. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठीयावाडी’ या सिनेमातील आलियाच्या फर्स्ट लूकचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.

संजय लीला भन्साळीचा हा सिनेमा आलियाच्या करिअरमधील एक मायलस्टोन ठरेल असेही बोललं जातंय. या सिनेमाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे.
या सिनेमाची कथा हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी प्रथम प्रियांका चोप्राला दिग्दर्शकांची पसंती असल्याचं सांगण्यात येत होतं. आता आलियासोबत कोणता कलाकार स्क्रीन शेअर करणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा