गरजूंना शिक्षण देण्यासाठी सोडले आय ए एस पद

आय ए एस अधिकारी होणे हे कित्येकांचे स्वप्न असते. आयएएस होण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करूनही बऱ्याच सणांना वर्षानुवर्षे यश मिळत नाही. पण तुम्ही असे धाडस करू शकाल का की तुम्ही आयएएस अधिकारी झाला आहात आणि दोन वर्षांनी तुम्ही राजीनामा देत आहात. असे धाडस कुणी स्वप्नातही करू शकणार नाही. हे धाडस करण्याचे साहस रोमन सैनी यांनी केले आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी.
वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी एम्ससारख्या नामांकित संस्थेत प्रवेश परीक्षा पास केली. त्यांनी डॉक्टरेटचे शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या २२ व्या वर्षी आयएएसची परीक्षाही पास केली. तेही पहिल्याच प्रयत्नात. हा तरुण आयएएस अधिकारी आता सिव्हिल सेवेत रुजू होण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग देत आहे. डॉ रोमन सैनी यांची ही कहाणी आहे.
राजस्थानमधील कोटपुतळीच्या रायकरणपुरा गावात राहणारे रोमन अवघ्या २३ वर्षांचे आहे. २०१३ मध्ये त्यांनी आयएएस परीक्षा पास केली आणि देशभरात १८ व्या क्रमांकावर आले. रोमन यांना आयएएसकडे जाऊन शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचं होत.
रोमन मानतात की, ‘२०११ मध्ये जेव्हा मी काही वैद्यकीय शिबिरांमध्ये गेलो तेव्हा मला समजले की दारिद्र्य म्हणजे काय. लोकांचे आरोग्य, स्वच्छता आणि पाण्याच्या समस्येबद्दल जनजागृतीचा अभाव होता. या मूलभूत समस्या आहेत. डॉक्टर म्हणून मी त्यांच्या समस्या सोडवू शकलो नाही. त्यावेळी मी ठरविले की आपला देश अधिक चांगला होण्यासाठी नागरी सेवेत जाणे आवश्यक आहे.
रोमनची आई गृहिणी असून वडील अभियंता आहेत. ते त्यांच्या कुटुंबातील पाहिले आयएएस अधिकारी आहे. सहसा, यूपीएससी कोचिंगवर बरेच खर्च केले जातात आणि प्रत्येकजण कोचिंग घेण्यास सक्षम नसतो. सिव्हिल सेवेत रुजू झाल्यानंतर रोमन यांनी ठरवले की ते इतर सहभागींना मोफत ऑनलाईन प्रशिक्षणात मदत करेल. त्यासाठी त्यांनी ‘अनकेडमी’ सुरू केली. ही एक ऑनलाइन कोचिंग वेबसाइट आहे जी ते आपला मित्र गौरव मुंजाल यांच्या सहकार्याने चालवितात.
रोमन यांचे व्हिडिओ आणि भाषणे यांना सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर दररोज शेकडो हिट होत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा