गोल पोस्ट गुन्हा गॅस कटरने रात्रीतून पाच दुकाने फोडली

गॅस कटरने रात्रीतून पाच दुकाने फोडली

बारामती, २७ डिसेंबर २०२०: काल बारामतीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजी चौकातील अपार्टमेंट मधील पाच दुकानात गॅस कटरच्या साहाय्याने कुलूप तोडुन चोरट्यांनी फक्त चोरीच केली नाही तर दुकानात बसून आईस्क्रीम देखील खाल्ली.

बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शिवाजी चौकातील सुखशांती अपार्टमेंट मधील पाच दुकाने चोरट्यानी रात्रीतून फोडली आहे. यामध्ये कलर, शु मार्ट, डिझाइन, इलेक्ट्रिक व आइसक्रीमचे दुकान ही गॅस कटरच्या साहाय्याने तोडुन दुकानातील बावीस हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे.

शिवाजी चौका मध्ये मोठी वर्दळ असते. दुकाना मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चोरट्यांचा चोरीचा प्रकार कैद झाला असून सीसीटीव्ही मधील चेहर्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. बारामती शहरात मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या चोरीमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. तर चोरट्यांनी दुकानात आईस्क्रीम देखील खाल्ली. रहिवासी वस्तीमध्ये झालेल्या चोरी मुळे पोलिसांना आवाहन दिले आहे. तर शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी संपूर्ण शहरातील चौकात व महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतल्याने याचा फायदा होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version