विशाखापट्टणममध्ये पुन्हा गॅस गळती

विशाखापट्टणम, दि. ८ मे २०२०: विशाखापट्टणममध्ये पुन्हा एकदा गॅस गळतीची घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी पुन्हा गॅस गळतीची नोंद आहे. यावेळी अग्निशमन दलाचे ५० कर्मचारी उपस्थित असून एनडीआरएफचे कर्मचारीदेखील त्यांच्यासमवेत मोर्चेबांधणी करीत आहेत. यासह, गॅस गळती निष्क्रिय करण्यासाठी पीटीबीसी केमिकल ला एअर इंडियाच्या स्पेशल कार्गो विमानाने गुजरातला पाठवण्यात आले आहे.

विशाखापट्टणम जिल्ह्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी संदीप मोहन यांनी सांगितले की, कंपनीच्या आसपास सुमारे ५ किमी अंतरावर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कंपनीत स्टायरीन गॅस गळतीमुळे आजूबाजूच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आहे.

ताज्या माहितीनुसार अग्निशामक यंत्रणेच्या आणखी १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याबरोबर २ फोम टेंडर्स च्या गाड्या देखील आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज आहेत. आंध्र प्रदेश पोलिसांनीही एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे, ज्यावर लोक संपर्क साधून मदतीसाठी विचारू शकतात. जागरुक राहण्याचे आवाहनही केले. पोलिसांनी घाबरू नका, आसपासचे गावे रिकामी करण्याचे आवाहन देखील केले.

ही घटना विशाखापट्टणमच्या गोपालापट्टनम भागातील आहे. यापूर्वी गुरुवारी पहाटे अडीच वाजता स्टायरीन गॅसची गळती झाली. गॅस गळती एलजी पॉलिमर्स इंडिया प्रा. लि. कंपनीत झाला. गॅस गळतीमुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गॅस वाल्व्हमध्ये खराबी:

सुरुवातीच्या तपासणी अहवालात हा अपघात गॅस वाल्व्हमधील समस्येमुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. बुधवार आणि गुरुवारी दुपारी अडीच वाजता गॅस वाल्व खराब झाला आणि विषारी गॅस गळती झाली. विशाखापट्टणम महानगरपालिकेचे आयुक्त श्रीज्ञा गुम्मल्ला म्हणाले की, प्राथमिक अहवालानुसार पीव्हीसी किंवा स्टायरिन गॅस गळती झाली आहे. पहाटे अडीच वाजता गळतीस प्रारंभ झाला. शेकडो लोक गॅस गळतीच्या गर्तेत आले आणि बरेच लोक बेशुध्द देखील झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा