बारामतीत वैद्यकीय क्षेत्राला गॅसचा पुरवठा होणार सुरळीत – आयुष प्रसाद

बारामती, दि १४ सप्टेंबर २०२०: आज बारामती शहरातील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी येथे सहा हजार लिक्विड गॅसचा साठा केला जाणाऱ्या गॅसची टाकी बसवली आहे. हा गॅस येथील हॉस्पिटलला पाच दिवस पुरणार असल्याचे प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

बारामती तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी अत्यावस्थ असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी सिल्व्हर जुबली हॉस्पिटलमध्ये सहा हजार लिटर लिक्विड गॅसची टाकी बसवण्यात आली आहे. जिल्ह्यातील हॉस्टेल व शाळा ताब्यात घेऊन येथे कोविड सेंटर उभारले जात आहेत. त्यामुळे कोविडची साखळी तुटुन पुढे कोविड रुग्ण वाढणार नाहीत. सध्या जिल्ह्यात २८० सेंटर सुरू आहेत तसेच व्हेंटिलेटर बेड तयार केले जात आहेत. ५५० खाजगी डॉक्टरांची सेवा अधीग्रहन करण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील १५ पेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या १०० गावांत ५० कुटुंबाच्या मागे एक पथक अशी मोहीम राबवली जाणार आहे. तर बारामती शहरात बुधवार, गुरुवार, शुक्रवार पासून मोहीम राबवली जाणार आहे.

जिल्ह्यात १९० मेट्रिक टन गॅस १८० हॉस्पिटल मधील कोविड रुग्णांसाठी वापरला जात आहे. पूर्वी वैद्यकीय साठी ३० टक्के व इंडस्ट्रीयल साठी ७० टक्के गॅस वापरला जात होता, मात्र सध्या कोविड मुळे ९५ टक्के गॅस हा वैद्यकीय सेवेसाठी वापरला जातो आहे. शहरातील सरकारी व खाजगी हॉस्पिटलला गॅस कमी पडणार नाही असे प्रसाद यांनी सांगितले. नव्याने बसविण्यात आलेल्या गॅसच्या टाकी संदर्भात महिती देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे यांनी सांगितले, शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने जम्बो सिलेंडरची मागणी वाढली आहे.

शहरात रोज १ हजार सिलेंडरची मागणी आहे. या सहा हजार लिटर लिक्विड गॅसमुळे उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे ८६ बेड आहेत. तर २० आय सी यु बेड आहेत. हा गॅस साधारण पाच दिवस पुरणार आहे. आता रोज ५०० जम्बो सिलेंडर लागणार आहेत. टाकीमध्ये पहिला टँकर भरला जाईल त्यामुळे गॅसच्या टंचाईचा प्रश्न मीटणार आहे. तर जम्बो सिलेंडर मध्ये गॅस मध्ये देखील गॅस शिल्लक राहणार आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन पासून वंचित राहावे लागणार नाही. रुग्ण सेवा सुरू आहे आणि सुरू राहणार याची मी ग्वाही देतो असे डॉ काळे यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा