बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागं टाकत गौतम अदानी बनले जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२२ : फोर्ब्सच्या रीयल टाईम बिलेनियर लिस्ट नुसार आदानी ग्रुपचे चेअरमन आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम आदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५३.९ बिलियन डॉलर एवढी आहे तर बर्नार्ड अर्नॉल्ट यांची संपत्ती १५३.६ एवढी आहे. म्हणून बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकत गौतम आदानी यांनी त्यांची जागा घेतली आहे.

फोर्ब्सच्या डेटा नुसार आदानी हे आता एलोन मस्क यांच्या काही पाऊल मागे आहेत. यादरम्यान भारताचे दुसरे एक उद्योगपती मुकेश अंबानी फोर्ब्सच्या रीयल टाईम बिलेनियर लिस्ट च्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९१.९ बिलियन डॉलर आहे. गौतम आदानी यांचं आदानी ग्रुप हे भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर गौतम आदानी हे पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत. गौतम आदानी यांच्या समूहामध्ये ऊर्जा बंदरे, लॉजिस्टिक्स खानकाम, संसाधने गॅस संरक्षण, एरोस्पेस आणि विमानतळ या व्यवसायांसह सार्वजनिक उद्योगाचा समावेश आहे.

अदानी ग्रुप हा (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा ग्रुप) नंतर तिसरा सर्वात मोठा ग्रुप आहे. आदानी उद्योगाचा पसारा आदानी इंटरप्राईजेस, अदानी ग्रीन एनर्जी स्पेशल इकॉनोमिक झोन, अदानी पावर, अदानी टोटल गॅस, आणि आदानी ट्रान्समिशन या अदानी समूहाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. गेल्या ५ वर्षात इंटरप्राईजेसने विमानतळ, सिमेंट, तांबे शुद्धीकरण, डेटा सेट्स, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल रिफायनिंग, रस्ते आणि सौर सेल उत्पादन अशा नवीन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. आता अदानी ग्रुप दूरसंचार क्षेत्रातही प्रवेश करणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा