गौतम अदानींची एका महिन्यात श्रीमंतांच्या यादीत ५ क्रमांकांनी घसरण

नवी दिल्ली, १ जुलै २०२१: गेल्या एक महिन्यात अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घट झालीय. ज्यामुळं अदानी समूहाचे प्रमुख गौतम यांच्या संपत्तीत मोठी घट झालीय. एका महिन्यात गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत १४ व्या क्रमांकावरुन १९ व्या स्थानावर घसरले आहेत.

एका महिन्यापूर्वी गौतम अदानी यांची संपत्ती ५.४८ लाख कोटींपेक्षा जास्त होती, जी आता खाली आली आहे आणि ४.५२ लाख कोटींवर गेलीय. मालमत्ता कमी झाल्यानं अदानी ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात १९ व्या स्थानावर घसरले आहेत.

तथापि, हे सर्व असूनही, गौतम अदानींची संपत्ती २०२१ मध्ये सर्वाधिक वाढली आहे. या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यांत मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्यासह ४ उद्योगपतींच्या संपत्तीत ४४.७५ अब्ज डॉलर (३.३५ लाख कोटी डॉलर) वाढ झालीय.

जून महिन्यात अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली असली तरी यावर्षी अदानींची संपत्ती सुमारे २ लाख कोटी रुपयांनी वाढून ४.५२ लाख कोटी रुपयांवर गेलीय. मात्र, गेल्या महिन्यात अदानींची संपत्ती ५.४८ लाख कोटी रुपयांवर गेली.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या अहवालानुसार देशात असे दोन अब्जाधीश व्यापारी आहेत, ज्यांची संपत्ती यावर्षी घटली आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या सायरस पूनावाला आणि आशियातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांची संपत्ती दोन अब्ज डॉलर्सने घटलीय.

अंबानींची संपत्ती २० हजार कोटींनी वाढली

त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती २० हजार कोटी रुपयांनी वाढून ५.८६ लाख कोटी रुपयांवर गेलीय. मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. ते जगातील १२ वे सर्वात श्रीमंत उद्योजक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा