इलॉन मस्कपासून गौतम अदानी फक्त एक पाऊल दूर, नंबर-२ वर येण्याची लढाई सुरू!

पुणे, ७ जानेवारी २०२३: जगातील टॉप-१० अब्जाधीशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. या यादीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या नावावर लवकरच एक मोठी उपलब्धी जोडली जाऊ शकते. वास्तविक, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना सोडून ते कधीही जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतात. वास्तविक, मस्क आणि अदानी यांच्या नेटवर्थमधील अंतर आता खूपच कमी झालंय. चला जाणून घेऊया नंबर-२ च्या खुर्चीसाठी गौतम अदानी किती मागं आहेत…

अब्जाधीश इलॉन मस्कसाठी २०२२ हे वर्ष वाईट ठरले असले तरी २०२३ हे नवीन वर्षही त्यांच्यासाठी फारसं चांगलं ठरंल असं वाटत नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस, फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट यांनी मस्क यांच्या डोक्यावरून जगातील पहिल्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा मुकुट हिसकावला आणि तो दुसऱ्या क्रमांकावर घसरले. त्याच बरोबर २ नंबरची खुर्चीही त्यांच्यापासून धोक्यात आहे, कारण भारतीय उद्योगपती गौतम अदानी मस्कशी स्पर्धा करताना त्यांच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.

दोघांमध्ये ५ बिलियन डॉलरचा फरक

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, गौतम अदानी आणि इलॉन मस्क यांच्या संपत्तीतील फरक सतत कमी होतोय आणि शुक्रवार, ६ जानेवारी २०२३ रोजी निव्वळ संपत्तीमध्ये फक्त ५ अब्ज डॉलरचा फरक होता. इलॉन मस्क १२४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह टॉप-१० श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडं, गौतम अदानी ११९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर होते. ज्या वेगानं अदानींची संपत्ती वाढत आहे, त्यावरून असं म्हणता येईल की कधीही मस्क यांना मागं टाकून ते जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतात.

दुसऱ्यांदा होतील नंबर २चे श्रीमंत

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या नावात ही कामगिरी पहिल्यांदाच जोडली जाणार नाही. याआधी गेल्या वर्षी २०२२ मध्येही त्यांनी हे स्थान पटकावलं होतं, परंतु फारच कमी कालावधीसाठी. महत्त्वाचं म्हणजे, जगातील श्रीमंतांमध्ये गौतम अदानी हे एकमेव उद्योगपती आहेत ज्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झालीय. त्यांची संपत्ती केवळ एका वर्षात ३३.८० अब्ज डॉलरने वाढली. याउलट, २०२१ पासून सतत नंबर-१ श्रीमंत असलेल्या एलोन मस्क यांची गेल्या वर्षी २०० अब्ज डॉलर्सहून अधिक संपत्ती कमी झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा