गौतम अदानी यांनी घेतली मुंबई विमानतळाची कमान, हजारो नवीन नोकऱ्यांचे आश्वासन!

6

मुंबई, १४ जुलै २०२१: अब्जाधीश व्यावसायिक गौतम अदानीच्या अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेण्याचे काम पूर्ण केले आहे. खुद्द गौतम अदानी यांनी मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून अदानी समूह एविएशन सेक्टर मध्ये आपली पकड मजबूत करीत आहे आणि मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेणे या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

हजारो नोकर्‍या देण्याचे आश्वासन

गौतम अदानी यांनी ट्वीट केले की, ‘वर्ल्ड क्लास मुंबई इंटरनेशनल एयरपोर्टचे व्यवस्थापन ताब्यात घेतल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. मुंबईला अभिमान वाटण्याचे आमचे वचन आहे. अदानी ग्रुप बिजनेस, लक्झरी आणि करमणुकीसाठी भविष्यातील एयरपोर्ट इकोसिस्टम तयार करेल. आम्ही हजारो स्थानिक लोकांना नवीन रोजगार देऊ.

अदानी ग्रुपकडे आधीपासूनच ६ विमानतळ

देशातील प्रमुख विमानतळांचे व्यवस्थापन खासगी हातात देण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ सालामध्ये बिड बोलण्याची मागणी केली होती. त्यानंतर अदानी समूहाला अहमदाबाद, लखनऊ, जयपूर, मंगलुरू, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांचे व्यवस्थापन व संचालन प्राप्त झाले. ग्रुपची १००% उपकंपनी असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) ने जीएमआरसारख्या बड्या कंपन्यांना पराभूत करून ५० वर्षे या विमानतळांचे संचालन करण्याचा ठेका जिंकला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा