गोल पोस्ट गुन्हा गौतम गंभीरला ISIS कश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या, घरातील सुरक्षा वाढवली

गौतम गंभीरला ISIS कश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या, घरातील सुरक्षा वाढवली

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021:गौतम गंभीर : माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गौतम गंभीरने आरोप केला आहे की त्याला ISIS काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. भाजप खासदाराने आता दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले की, गौतम गंभीरच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गौतम गंभीरने काल रात्रीच ही तक्रार दाखल केली आहे.

ISIS काश्मीरने फोन आणि ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गौतम गंभीरच्या वतीने करण्यात आला आहे.
गौतम गंभीर राजधानी दिल्लीच्या पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार आहे. यापूर्वी तो भारतासाठी क्रिकेट खेळला होता, काही काळापूर्वी त्याने राजकारणात प्रवेश केला होता.

गौतम गंभीर दोन विश्वचषक विजेत्या संघांचा एक भाग आहे, गौतम गंभीर 2007 T20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषक स्पर्धेत एक मोठा स्टार होता आणि त्याने दोन्ही फायनलमध्ये मॅच-विनिंग इनिंग खेळल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version