गव्हाची शिळी पोळी खा….समस्या सोडवा

अनेकदा रात्री राहिलेल्या पोळ्या एकतर फेकून दिल्या जातात अथवा गुरांना खायला दिल्या जातात. मात्र शिळी पोळी खाण्याचेही आरोग्यास खूप सारे फायदे आहेत. हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही शिळी पोळी कधीही फेकून देणार नाही.

अनेकदा लोक शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न वा पोळी आरोग्यासाठी हायानिकारक मानले जाते. १२ तासांहून अधिक काळ ठेवलेले अन्न खाल्ल्याने विषबाधा, ऍसिडिटी आणि पोट खराब होण्याची शक्यता असते. इतकंच नव्हे तर शिळे अन्न गरम करुन खाल्ल्याने आरोग्यास नुकसानही पोहोचते.

मात्र आता जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल. शिळे अन्न आरोग्यासाठी हानिकारक असते. मात्र असे काही पदार्थ असतात जे खाल्ल्याने आरोग्यास चांगले असतात. यातील एक म्हणजे गहू. भारतात मोठ्या प्रमाणात घरांमध्ये गव्हाची चपाती बनवली जाते.
अनेकदा राहिलेल्या पोळ्या एकतर फेकून दिल्या जातात अथवा गुरांना खायला दिल्या जातात. मात्र शिळी पोळी खाण्याचेही आरोग्यास खूप सारे फायदे आहेत. हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही शिळी पोळी कधीही फेकून देणार नाही

हे आहेत शिळी पोळी खाण्याचे फायदे
दुधासोबत शिळी पोळी खाण्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. शिळी पोळी दुधात १० मिनिटे भिजवून ठेवा. सकाळी नाश्त्यामध्ये दुधात भिजवून खाल्ल्याने पोळी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो.

आपल्या शरीराचे सामान्य तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते. तापमान ४० हून अधिक झाल्यास शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचते. दुधात भिजवलेली शिळी पोळी खाल्ल्यास शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते.

ज्यांना सतत पोटदुखीचा त्रास सतावते अशा लोकांनी शिळी पोळी खाल्ल्यास फायदा होतो. रात्री झोपण्याआधी दुधात भिजवलेली शिळी पोळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.

डायबिटीजच्या लोकांनी शिळी पोळी खाल्ल्यास फायदा होतो. दिवसभरात कधीही शिळी पोळी १० ते १५ मिनिटे दुधात भिजवून ठेवून खाल्ल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा