छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर २०२३ : संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले आहे. याबाबतची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारांच्या महसूल विभागाने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, औरंगाबाद विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर विभाग, औरंगाबाद जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, औरंगाबाद उप-विभाग छत्रपती संभाजीनगर उप-विभाग, औरंगाबाद तालुका छत्रपती संभाजीनगर तालुका म्हणून ओळखला जाईल.
दुष्काळसदृश परिस्थिती, अनुशेष आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात तब्बल सात वर्षांनंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलल्याबाबतची अधिसुचना जारी करण्यात आली आहे.
तर आता उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव जिल्हा, उस्मानाबाद उप-विभाग धाराशिव उप-विभाग, उस्मानाबाद तालुका धाराशिव तालुका आणि उस्मानाबाद गावचे धाराशिव गाव असे राहणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर