काही सेकंदात कोरोना व्हॅक्सिन सर्टिफिकेट हवय, व्हाट्सअपवर मेसेज च्या साह्याने मिळवा सर्टीफिकेट

पुणे, 15 डिसेंबर 2021: देशात कोरोना लसीचे सुमारे 133 कोटी डोस देण्यात आले आहेत आणि हा आकडा दररोज वाढत आहे.  कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाला लस मिळावी, असे सरकारचे उद्दिष्ट आहे.
वास्तविक, अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण प्रमाणपत्र (कोविड-19 व्हॅक्सिन सर्टिफिकेट) पाहिल्यानंतरच प्रवेश दिला जातो.  ज्या लोकांना लसीकरण केले गेले नाही त्यांना थांबवले जाते.  परंतु काही लोक लसीकरण प्रमाणपत्र मागितल्यावर नाराज होतात.  त्यांनी लसीचा डोस घेतलेला असतो, पण त्यांच्याकडे लसीकरण सर्टिफिकेट उपलब्ध नसते.
मिळवा एका मेसेज वर व्हॅक्सिन सर्टिफिकेट
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला लसीचे एक किंवा दोन्ही डोस मिळाले असतील, तर तुम्हाला कोरोना व्हॅक्सिन सर्टिफिकेट सहज मिळू शकते.  तुम्ही तुमच्या मोबाईलवर काही सेकंदात लसीचे प्रमाणपत्र मिळवू शकता.
विशेषत: प्रवासादरम्यान, व्हॅक्सिन सर्टिफिकेट प्रमाणपत्र आवश्यक आहे.  कोविड-19 चे प्रमाणपत्र काही सेकंदात मिळवण्यासाठी तुम्ही 9013151515 हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा.  त्यानंतर या क्रमांकावर व्हॉट्सअॅपमध्ये Certificate टाइप करून पाठवा.  तुम्हाला व्हॅक्सिन सर्टिफिकेट पीडीएफमध्ये लगेच मिळेल.
 लोकांच्या समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही सुरुवात केली आहे.  जेणेकरून लोकांना त्यांचे व्हॅक्सिन सर्टिफिकेट कधीही मिळू शकेल.  सरकारी तथ्य तपासणी संस्था PibFactcheck ने देखील या उपक्रमाला पुष्टी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा