घंटागाडी कर्मचार्यांची वैद्यकिय तपासणी करावी: बापूसाहेब शिंदे

श्रीरामपुर: महाराष्ट्रातील घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भुमिका महत्वाची आहे. तसेच घरातील ओला आणि सुका कचरा याचे विघटन करुन तो घंटा गाडीत जमा केला जातो. हा कचरा जमा करताना अनेकांच्या हातांचा स्पर्श होतो. गाडी भरेपर्यंत अनेक तास हे कर्मचारी घंटागाडीतच असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कचरा गोळा करणा-या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे , त्यांच्या साठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नमो फाऊंडेशनचे राज्य सल्लागार बापुसाहेब शिंदे यांनी केली आहे.

शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे माणुसकीच्या दृष्टीकोणातून पहाणे गरजेचे आहे.

शासनाने त्यांना चांगल्या प्रतीचे हँन्डग्लोज, मास्क, सेच पीपीई किट द्यावे. घंटागाडीचे रोज निर्जंतुकीकरण करावे तसेच दर आठ दिवसांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात यावी. राज्यातील सर्व नगर पालिका, महानगरपालिका ग्रामपंचायत सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय खेमनर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा