औरंगाबाद, २२ सप्टेंबर २०२२: मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी वडील मारहाण करतात म्हणून एका चौदा वषीय अल्पवयीन मुलीने प्रियकराचं घर गाठलं आणि लग्नाची गळ घातली आहे. आजकाळ अनेक मुलामुलींचं एकमेकांवर शाळेत असल्या पासून प्रेम प्रकरण चालू असतं.
शिवाय अल्पवयीन मुलं देखील आपल्या प्रेयसीला घेऊन पळून लग्न केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अनेक वेळा घरातूनच चागली वागणूक भेटत नसल्याने मुली असा विचार करतात. मग घरच्यांकडून मारहाणी सारख्या घटना घडतात. त्यावेळी मुलीना आपल्या प्रियकरावर जास्त विश्वास निर्माण होतो.
असाच प्रकार औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात घटला आहे. वडील घरी सतत मारहाण करतात म्हणून या मुलीने घरातून पळ काढला आणि थेट प्रियकराचे घर गाठले. परंतू मुलीच्या आई-वडीलानी थेट पोलिस ठाण्यात गेल्याचे समजताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी या मुलीला पोलिसांसमोर हजर केले.
मात्र त्या मुलीने वडीलांच्या घरी न जाता बालसुधारगृहात जाण्याचा मार्ग निवडला आहे. म्हणून आपल्या मुलांना योग्य वागणूक द्या म्हणजे ते टोकाचे पाऊल उचलणार नाही, आसे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर