मंचर, घोडेगाव : पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळया केलेल्या कारवाईमध्ये ४ लाख ७७ हजार ४५६ रूपये किंमतीची जीएम संत्रा कंपनीच्या देशी दारू व एक मारूती कंपनीची स्विफ्ट डिझायनर गाडी जप्त करण्यात घोडेगाव पोलीसांना यश आले आहे.
याबाबत घोडेगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप बोनवटे वय ३० व प्रविण सावंत दोघेही रा गंगापूर हे मंचर भीमाशंकर रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपासमोर मारूती कंपनीची एम एच १४ एच यु ७२७५ स्विफ्ट डिझायनर गाडी घेऊन जात असताना या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये ७ हजार ४८८ रूपयांच्या किंमतीची जी एम संत्रा कंपनीच्या देशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी यावर कारवाई करत ४ लाख ५० हजार रूपयांची स्विफ्ट डिझायनर गाडी जप्त केली आहे.याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई वृषाली भोर यांनी दिली आहे.
तर शिनोली गावचे हद्दीत बोडकी खिंड येथे कॅनॉल रोडच्या कडेला झुडुपामध्ये विकास भगवान काळे वय ३० रा. कोटमदरा फाटा हा १९ हजार ९६८ रूपये किंमतीची जी एम संत्रा कंपनीच्या देशी दारू जप्त करण्यात आली. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई अमोल काळे यांनी दिली आहे.
या तीनही व्यक्ति जिल्हाधिकारी यांचा संचार बंदीचा आदेश लागू असताना त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून मानवी जिवीताला धोकादायक असलेला कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचा संभव असल्याची जाणीव असताना तसेच चेह-याला कोणताही मास्क न लावता आपल्या जवळील बेकायदा बिगर परवाना देशी-विदेशी दारूचा साठा जवळ बाळगून त्याच्या ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करताना आढळून आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार करत आहे. न्युज अनकट प्रतिनिधी – साईदिप ढोबळे