नवी दिल्ली, २६ ऑगस्ट २०२२: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस चे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात संघटनात्मक बदल झाले पाहिजे यासाठी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये त्यांचा ही समावेश होतो.
त्यांनी वारंवार काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आपली नाराजी व्यक्त केली होती. गुलाम नबी आझाद हे बऱ्याच दिवसांपासून नाराज होते. गुलाम नबी आझाद पक्षाचे ज्येष्ठ नेते असून माजी मुख्यमंत्री देखील आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणुन काम केलं असून, त्यांनी अनेक महत्वाची पद भूषवली आहेत.
पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्या नंतर खासकरून पक्षाने २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्या नंतर असलेली सल्लागार यंत्रणा पुर्णपणे नष्ट करण्यात आली, असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. पक्षाच्या मोठ्या नेत्यांना बाजूला सारून कोणत्या ही अनुभव नसणारे पक्षाचे कामकाज चालवू लागले असा आरोप केला आहे.
पक्षावर गेल्या काही वर्षांपासून नाराज असलेले गुलाम नबी आझाद पक्षाविरोधात बंड पुकरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा ही रंगली होती. या आधी काँग्रेस मधून आनंद शर्मा यांनी निवडणूक समितीवरून राजीनामा दिला. पंजाब चे माझी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी पंजाबमध्ये वेगळा पक्ष स्थापन केला. त्या नंतर कपिल सिब्बल समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर गेले आहेत आणि आता गुलाब नबी आझाद यांचा राजीनामा आला आहे
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव