नवी दिल्ली, ३ ऑक्टोंबर २०२०: शुक्रवारी संध्याकाळी उशिरा रिलायन्स इंडस्ट्रीज,नं असं सांगितलं की, जागतिक स्तरावरील गुंतवणूक कंपन्यांपैकी आणखीन दोन कंपन्या रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करणार आहेत व रिलायन्स रिटेलशी जोडल्या जाणार आहेत. सिंगापूरची जीआयसी आणि अमेरिकेची टीपीजी मिळून सुमारे १ अब्ज डॉलर (७,३५०) कोटी रुपयांमध्ये रिलायन्स मधील १.६ इक्विटी हिस्सेदारी विकत घेणार आहे.
जीआयसी ५,५१२ कोटी रुपयांची गुंतवणूक करुन रिलायन्स रिटेल व्हेंचरमध्ये १.२२ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे, तर टीपीजी कॅपिटल एशिया फंड १,८३७ कोटी रुपयांमध्ये ०.४१ टक्के भागभांडवल खरेदी करणार आहे. त्याच्या विक्रीसाठी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचे मूल्य ४.२८ लाख कोटी रुपये आहे.
गेल्या तीन आठवड्यांत अनेक आघाडीच्या जागतिक फंड कंपन्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल उद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आतापर्यंत देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनीचा ७.३ टक्के हिस्सा ३६.२०० कोटी रुपयांना विकला आहे.
एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत, मध्यपूर्वेपासून ते अमेरिकेपर्यंत सुमारे पाच ते सहा गुंतवणूक कंपन्यांनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक केली. त्यामध्ये सिल्व्हर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक आणि मुबाडाला अशी नावे आहेत. रिलायन्स रिटेल देशभरात १२,००० स्टोअर चालविते.
नुकतीच कंपनीने ॲमेझॉन आणि वॉलमार्टशी स्पर्धा करण्यासाठी ई-कॉमर्स पोर्टल जिओमार्ट लॉन्च केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे