प्रथमेश पाटणकर, न्यूज अनकट प्रतिनिधी
तुम्ही Zomato, Swiggy, Ola Uber, Upwork आणि Urban Clap या सारख्या ऑनलाइन सर्व्हिस प्रोव्हायडरची नावे ऐकलीच असतील, पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का ? की लाखो लोक आपली पारंपरिक नोकरी सोडून gig economy मध्ये का संधी शोधत आहेत. आज सगळेजण आपल्या गरजेनुसार या प्रकारच्या कामाला जास्त प्राधान्य देत आहेत. हे सेक्टर असे आहे जिथे आपल्याला आपल्या सोयीनुसार काम करायला संधी मिळते त्यामुळे लोकांचा कल याकडे जास्त वाढत चालला आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये हे एक नवीन सेक्टर तयार झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया ! Gig Economy म्हणजे काय ?
“Gig economy” हा शब्द संगीत जगतातून घेतला असून जिथे कलाकार काही काळापुरता आपला कार्यक्रम बुक करतात.
पार्श्वभूमी :
कोविड १९ च्या काळात म्हणजेच २०२० पासून Gig Economy मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.लॉकडाऊनमुळे लोकांना घरून काम करावे लागले आणि ऑनलाईन वस्तू आणि सेवा खरेदी करण्यावर लोकांचा कल अधिक वाढत गेला. लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा हा ट्रेंड तसाच चालू राहिला. अपवर्कच्या अहवालानुसार २०२३ मध्ये जवळजवळ ६४ दशलक्ष अमेरिकन, जे अमेरिकेतील कामगारांच्या ३८% गिग्स व फ्रीलान्सर कामगार होते. या स्वतंत्र कामगारांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत १.२७ ट्रिलियन डॉलरचे योगदान दिले.


gig economy म्हणजे काय ?
अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आज २१ व्या युगात तंत्रज्ञानात भरभराटी होताना दिसत आहे. त्यामुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. फुल टाईम जॉब पेक्षा लोक आज फ्रीलान्सिंग, कॉन्ट्रॅक्ट बेस आणि टास्क ओरिएंटेड जॉबला जास्त मागणी व प्राधान्य देत आहेत .ही काळानुसार बदलत गेलेली अर्थव्यवस्था म्हणजेच Gig Economy होय.


Gig Economy मध्ये कोण काम करते ?
१) आर्थिक अडचणीत असलेले लोक जे गरजेपोटी अतिरिक्त आणि स्वतंत्र्य काम करतात.
२) स्वतंत्र एजंट, जे स्वतंत्र काम निवडतात आणि त्यातून त्यांचे प्राथमिक उत्पन्न मिळवतात
३) अतिरिक्त उत्पन्नासाठी स्वतंत्र कामाचा वापर करणारे आणि सहज कमावणारे.
४) अशे लोक जे आपल्या अतिरिक्त ज्ञानात भर घालतात.
- गिग इकॉनॉमीचे फायदे :
१) कामाचे लवचिक तास : गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या इच्छेनुसार कितीही तास काम करण्याची मुभा आहे. एखादे काम कामगाराला अंतिम तारखेसह करायला दिले जाईल, परंतु ते त्यावर काम कधी करतील हे पूर्णपणे त्यांच्या मनाप्रमाणे असेल.
२) अनेक कंपनीसाठी एकाचवेळी काम करण्याची संधी: या सेक्टरमध्ये कामगाराला आपल्या इच्छेनुसार काम करण्याची संधी असल्याने आणि कोणताही दबाव नसल्याने कामगार एकाच वेळी अनेक कंपनीसोबत काम करून पैसे कामवु शकतात.
३) स्वातंत्र्य : गिग इकॉनॉमीमध्ये स्वतंत्र कंत्राटदारांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे उलट ते त्यांच्या स्वतःच्या जागेत बसून काम करतात. घरच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपासून ते लेख लिहिणाऱ्या व्यक्तीपर्यंत ते उबरसाठी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीपर्यंत ते वेगवेगळे असते.
४) कमी गुंतवणुकीत स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो: लोक या कामात घरून काम करत असल्याने त्यांना स्वतंत्र ऑफिसची गरज भासत नाही.ठराविक कालावधीसाठी लोकांना कामावर घेतले जाते. त्यामुळे त्यांना PF आणि HR पॉलिसी यासारख्या गोष्टींची आवश्यकता नसते.
- गिग इकॉनमी आव्हाने :
१) स्थिर उतपन्नाचा आभाव : पारंपरिक नोकरीमध्ये कामगारांचा दर महिन्याचा पगार ठरलेला असतो, पण गिग इकॉनमी मध्ये कामगारांचे वेतन ठरलेले नसते. त्यांनी जेवढ काम केल आहे. तेवढ्याच दिवसच वेतन त्यांना दिल जात. यामध्ये त्यांना काही महिन्यासाठी चांगले काम मिळते तर काहीवेळेस मिळत सुद्धा नाही.
२) नोकरीची सुरक्षा नाही: जे लोक पूर्णवेळ नोकरी करतात त्यांना नोकरीची गॅरंटी दिली जाते तस गिग इकॉनॉमी मध्ये पूर्णवेळ नोकरीची गॅरंटी दिली जात नाही. क्लाइंटच्या गरजेवर तुमची नोकरी ठरलेली असते.
३) कर्मचारी फायदे मिळत नाही: पूर्णवेळ नोकरीत कामगारांना PF, आरोग्य विमा , बोनस आणि पेड लीव्ह मिळते. हेच फायदे गिग कामगारांना मिळत नाही.
४) मोठी स्पर्धा आणि कमी दर: आज हजारो वर्कर्स या कामाकडे आपला कल फिरवत आहेत. त्यामुळे काही वेळा कमी दरात आर्थिक काम करावे लागते. ज्यामुळे मेहनत जास्त आणि वेतन कमी मिळते.
- गिग इकॉनमी मध्ये भारताची स्थिती:
भारतीय गिग इकॉनॉमीमध्ये मोठे बदल घडले आहेत हे बदल तंत्रज्ञानातील प्रगती, कामाच्या प्राधान्यांमध्ये आणि कोविड-१९ महामारीच्या प्रभावामुळे झाले. सुरुवातीला एक छोटे क्षेत्र असलेली गिग इकॉनॉमी या काळात मुख्य प्रवाहातील लोकांचे रोजगार मॉडेल बनली आहेत.नीती आयोगाच्या जून २०२२ च्या अहवालानुसार भारतात गिग कर्मचाऱ्यांची संख्या ७.७ दशलक्ष वरून २०२९-३० पर्यंत २३.५ दशलक्ष पर्यंत वाढण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. या अहवालातुन सिद्ध करण्यात आले की, ३१% कामगार हे कुशल कामात, ४७% मध्यम कुशल कामात आणि २२% कामगार उच्च कुशल कामात होते.


त्याचबरोबर बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप (BCG) ने केलेल्या एका अभ्यासानुसार, भारतीय गिग इकॉनॉमीमध्ये भारतातील कृषी क्षेत्राव्यतिरिक्त ९० दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे, ज्यामध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढीद्वारे भारताच्या GDP मध्ये १.२५% पर्यंत भर घालण्याची क्षमता आहे.

