गोल पोस्ट क्रीडा जिल्हास्तरीय खो-खो खेळाडूचा विजेच्या शॉकने  मृत्यू

जिल्हास्तरीय खो-खो खेळाडूचा विजेच्या शॉकने  मृत्यू

कर्जत, २० ऑगस्ट २०२०: कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील योगेश गोरख सुपेकर या २५ वर्षीय युवकाचा विजेचा शॉक लागून आज दुर्दैवी मृत्यू झाला.

जिल्ह्यात खो-खो या खेळात विशेष प्राविण्य मिळवले होते. यामुळे जिल्हा खो-खो खेळाडू म्हणून ओळखलं जातं होत. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असलेल्या योगेश हा आपल्या घरी विजेची जोडणी करत असताना विजेचा धक्का बसला. उपचारासाठी त्यास तात्काळ कुळधरण येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

योगेशच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. शालेय काळात खो-खो या खेळात जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांने चमक दाखविली होती. त्याच्या अकस्मात जाण्याने कुळधरणसह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version