गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीमय होण्यासाठी आ. बबन शिंदेना मंत्रिमंडळात स्थान द्या

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीमय होण्यासाठी आ. बबन शिंदेना मंत्रिमंडळात स्थान द्या

सोलापूर, दि. २९ जून २०२०: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अभिप्राय, मत व प्रतिक्रिया अभियान या उपक्रमांमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातील आतापर्यंत सात हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला असुन हजारो लोकांनी, आमदार बबनराव विठ्ठलराव शिंदे यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जा देऊन सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली तरच राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्ह्यातील ढासळलेल्या परिस्थितीत सुधारणार होणार आहे, असे स्पष्ट मत आपल्या प्रतिक्रिया व अभिप्रायातून व्यक्त केले आहे अशी माहिती माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिली आहे.

अधिक वृत्तांत असा की राष्ट्रवादी कांँग्रेस पार्टी अभिप्राय अभियान अंतर्गत नागरिकांच्या कडून ऑनलाइन प्रतिक्रियांची सध्या नोंदणी केली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात, प्रत्येक मतदारसंघात,गावोगावी हा कार्यक्रम ३० जून पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक प्रश्नावली विचारण्यात आलेली आहे व याअंतर्गत प्रत्येक नागरिकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा विषयी कांही प्रश्न विचारून आपले मत, प्रतिक्रिया व अभिप्राय नोंदवण्याचे आव्हान केले आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून आतापर्यंत सात हजाराहून अधिक नागरिकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे,. व आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय व्यक्त केला आहे.

अनेकांनी असे मत व्यक्त केले आहे की एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्याची राष्ट्रवादीमय होण्यासाठी आ. बबनदादा शिंदेना मंत्रिमंडळात स्थान द्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version