पश्चिम बंगाल टीएमसी नेत्याला जामीन द्या नाहीतर ड्रग्ज प्रकरणात अडकून टाकू, न्यायधीशांना धमकी!

कोलकत्ता, ३० ऑगस्ट २०२२: पश्चिम बंगाल मधील आसनोल सीबीआय कोर्टाचे न्यायधीश राजेश चक्रवर्ती यांना धमकीचे पत्र लिहिले आहे. वकील सुदिप्त रॉय यांना धमकीचे पत्र दिल्याच्या आरोपात अटक केली आहे.

वकील सुदिप्त रॉय यांच्या जवळचे सहकारी आणि तृणमूल काँग्रेसचे दिग्गज अनुब्रता मंडल यांना जामीन देण्याची मागणी केली आहे. रॉय पत्रात लिहतात की पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळचे अनुब्रत मंडल यांना जामीन दिला नाही तर न्यायधीश तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला NDPS प्रकणात आडकून टाकू.

एनडीपीएस (NDPS) गुन्हा म्हणजे काय?

नशेच्या पदार्थाचे सेवन करणे, नशेचे पदार्थ बनवणे आणि त्याची खरेदी विक्री करणे हा प्रकार घडला तर एनडीपीसी गुन्हा लावला जातो. या गुन्हाला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा १९८५ असे म्हणतात.

अनुब्रत मंडल यांना ११ ऑगस्ट ला जनावरांची तस्करी करण्याच्या प्रकरणात सीबीआय ने अटक केली आहे. नंतर मंडल यांना आसनोल च्या सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना १० दिवसा च्या रीमाड वर पाठवलं होतं. त्या नंतर पुन्हा एकदा मंडल यांना २४ ऑगस्टला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. पण याच्या आगोदर अनुब्रत मंडल यांच्या वकीलांनी मेडीकलसाठी जामीन मागितला होता. पण कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला असून न्यायालयाने अनुब्रतांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता त्यांना ७ सप्टेंबरला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा