इंदापूर, दि. २६ जुलै २०२०: महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे होय. यंदाचे २०२० हे वर्ष अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांची साहित्य क्षेत्रातील कारकीर्द पाहता महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न पुरस्काराची शिफारस होणे आवश्यक आहे.
याकरिता विधानसभा आणि विधान परिषद सभागृहात ठराव होणे महत्त्वाचे असते. परंतु, कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे हे शक्य नाही, म्हणून शासनाने प्रस्ताव तयार करणे आवश्यक आहे. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी शासनाने प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवावा अशी मागणी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून होत असल्याचे आमदार यशवंत मानेंनी सांगितले.
त्यामुळे शासनाने त्वरित अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भातील भारतरत्न पुरस्कारासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा. अशी मागणी मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे