आम्हाला खून करण्याची परवानगी द्या ; रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींना मागणी

17
On the occasion of this second day, Rohini Khadse, the women's state president of the Sharad Pawar group, has made a bold statement to her husband as the President. Give us permission to kill.
दुसरीकडे या दिवासानिमित शरद पवार गटच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आगळ्या वेगळ्या पद्धतीने मागणी केली आहे. आम्हाला खून करण्याची परवानगी द्या.अशी मागणी त्यांनी केली आहे.

Rohini Khadse request to the President: आज ८ मार्च संपूर्ण जगभरात आंतराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातोय. आजच्या दिवशी नारीशक्तिच कौतुक केल जात. मात्र दुसरीकडे या दिवासानिमित शरद पवार गटच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आगळ्या वेगळ्या पद्धतीने मागणी केली आहे. आम्हाला खून करण्याची परवानगी द्या.अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून ते सोशल मिडियावर शेअर केले आहे.

सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे. असे रोहिणी खडसे यांनी पत्रात लिहिले आहे.

A Marathi-language letter written by Adv. Rohini Eknathrao Khadse addressed to the President of India, Draupadi Murmu. The letter discusses rising concerns about women's safety in India, referencing recent incidents of violence against women and urging immediate action. The letter emphasizes the need for strict laws and social reforms to ensure women's security and concludes with a plea for a strong stance against such issues. The content is framed as an appeal from Indian women on International Women's Day.

आज आपण रोज स्त्रियांच्या बाबातीत विचित्र घटना घडताना पाहतोच आहे. त्यामुळे देशात महिला असुरक्षित आहेत. प्रत्येक दिवशी महिलांवर कुठेतरी अत्याचार घडतोय. दोन दिवसांपूर्वीच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मागच्या काही दिवसांपूर्वीच शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. मुख्यमंत्री महोदय १२ वर्षीय मुलीवर बलात्कार होतो. विचार करा काय परिस्थिती असेल ?

हीच जागतिक महिला दिनाची भेट समजूयात

महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती. मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा