पुणे, दि. २१ जुलै २०२०: ग्लेनमार्क या कंपनीने काही दिवसांपूर्वी फाबिफ्लू नावाची गोळी बाजारामध्ये आणली होती. या गोळी ची किंमत १०३ रुपये असे ठरवण्यात आली होती. यावर आक्षेप घेत खासदार अमोल कोल्हे यांनी असे म्हटले होते की, कंपनीचा हा दावा खोटा आहे. तसेच देशातील गरीब जनतेला ही गोळी घेणे देखील शक्य नाही. महत्त्वाचे म्हणजे यावेळी कंपनीने असा दावा केला होता की, ही गोळी मधुमेह उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे. या गोळीच्या साह्याने उपचारासाठी चौदा दिवसांचा कोर्स करणे आवश्यक होते. म्हणजेच १०३ रुपये किंमत असलेल्या या गोळी साठी १४ दिवसांसाठी १२,५०० इतका दर आकारला जात होता.
खा. अमोल कोल्हे यांच्या दाव्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसी आय) ‘फाबिफ्लू च्या खोट्या दाव्याप्रकरणी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला स्पष्टीकरण मागविण्यासाठी नोटीस बजावली. दरम्यान ग्लेनमार्क कंपनीने या गोळीचे दर कमी करुन ७५ रुपयांवर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत अखेर डीसीजीआयने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीकडे स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली. दरम्यान डॉ. कोल्हे यांनी फाबिफ्लू गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत ७५ रुपये प्रती गोळी इतकी कमी केली असून आता १४ दिवसांच्या कोर्ससाठी रु.९१५० इतका खर्च येणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी