ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल विराटच्या सेनेत, तर चेतेश्वर पुजारा चैन्नई संघात……

चेन्नई, १९ फेब्रुवरी २०२१: आयपीएल २०२१ मधे १४ व्या सीझन साठी खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. मागील वर्षी २०२० मधे आयपीएलचा १३ वा हंगाम दुबईत झाला आणि त्या नंतर लगेच १४ व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होण्याच्या प्रक्रियेवर सेशन सुरू झाले आहे. त्यात अनेक वेगवेगळ्या खेळाडूंवर सर्वांची नजर आहे.

किंग्ज़ इलेव्हन पंजाब कडून तुफान फटकेबाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल यंदा राॅयल चॅलेर्जंस बंगळूरू या विराटच्या संघातून खेळताना दिसणार आहे आणि त्यासाठी ग्लेन मॅक्सवेल वर चांगलीच बोली लागल्याचे दिसून आले.

राॅयल चॅलेर्जंस बंगळूरू या संघाने १४.२५ कोटी मधे ऑस्ट्रेलियाच्या तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला खरेदी केले. यंदा ग्लेन मॅक्सवेल हा चाहत्यांना पंजाब ऐवजी विराटच्या संघातून खेळताना दिसणार आहे.

तर चेतेश्वर पुजारा सात वर्षानंतर आयपीएल मधे……

तर जवळपास सात वर्षानंतर चेतेश्वर पुजारा १४ व्या हंगामात खेळताना दिसणार आहे. या लिलावामधे चैन्नई सुपर किंग्सने चेतेश्वर पुजाराला ५० लाखाच्या बोलीवर खरेदी केले आहे. त्यामुळे तो आता चाहत्यांना सात वर्षानंतर चैन्नई सुपर किंग्स संघातून खेळताना दिसणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा